महाराष्ट्र मद्यराष्ट्र होणार होतं, आम्ही होऊ दिलं नाही; राऊतांचा फडणवीसांना टोला

| Updated on: Jan 28, 2022 | 10:53 AM

राज्याला मद्य महाराष्ट्र बनवणार आहात का? असा सवाल भाजपने (bjp) केला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपच्या या टीकेचा समचार घेताना भाजपला शेतकरी विरोधी ठरवलं आहे.

राज्य सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला (wine) परवानगी दिली आहे. त्यावरून भाजपने ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. राज्याला मद्य महाराष्ट्र बनवणार आहात का? असा सवाल भाजपने (bjp) केला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपच्या या टीकेचा समचार घेताना भाजपला शेतकरी विरोधी ठरवलं आहे. राज्य सरकारने सुपर मार्केटमधून वाईन विक्रीला दिलेली परवानगी हा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव मिळेल. त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. वाईनला विरोध करणाऱ्यांनी शेतकऱ्यांचं आर्थिक गणितही समजून घ्यावं, असं सांगतानाच वाईन विक्रीच्या निर्णयाला विरोध करणारे शेतकऱ्यांचे शत्रू आहेत, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी केली आहे.

TET Exam Scam| TET परीक्षेत पैसे देऊन 7 हजार 800 परीक्षार्थी पास, पुणे सायबर पोलिसांच्या तपासात समोर
EP1: Bas Evdhach Swapn | प्रवासी मजुरांच्या बजेटकडून अपेक्षा काय? Money9