संजय राऊत यांना पुन्हा हक्कभंग नोटीस, आता कोणती नवी दिली डेडलाईन?
VIDEO | संजय राऊत यांना विधिमंडळाकडून हक्कभंग प्रकरणी पुन्हा एकदा नवी नोटीस, आता काय म्हटले नोटीसमध्ये...?
मुंबई : विधिमंडळ पक्ष म्हणजे शिवसेना नाही असे कोर्टाने सांगितल्यानंतर महाराष्ट्रात विधिमंडळ हे तर चोर मंडळ आहे, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले होते. संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य त्यांना चांगलंच भोवतंय असे दिसतेय. दरम्यान, संजय राऊत यांना हक्कभंग प्रकरणी पुन्हा नोटीस बजावण्यात आली आहे. तर हक्कभंग नोटीसला उत्तर देण्यासाठी संजय राऊत यांना ७ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ही नोटीस विधिमंडळाकडून पुन्हा एकदा संजय राऊत यांना पाठवण्यात आली असून त्या नोटीशीला उत्तर देण्यासाठी वेळ वाढवून देण्यात आला आहे. संजय राऊत यांनी हक्कभंग नोटीसवर खुलासा देण्यासाठी मुदतवाढ मागितली होती. त्यानंतर त्यांनी ही नोटीस देण्यात आली आहे.
Published on: Mar 14, 2023 10:29 PM