संजय राऊत यांनी केली किरीट सोमय्यांची नक्कल अन् काय दिलं थेट आव्हान?

| Updated on: Feb 05, 2024 | 4:07 PM

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केल्यानंतर संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांनी डिवचलंय. संजय राऊत यांनी गणपत गायकवाड प्रकणावरून किरीट सोमय्या यांच्यावर सडकून टीका करत निशाणा साधलाय

मुंबई, ५ फेब्रुवारी, २०२४ : हिमंत असेल तर वर्षावर जाऊन एकनाथ शिंदे यांच्याकडे हिशोब मागा, असं आव्हान उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना दिलं. यावेळी संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांची नक्कल करत सडकून टीका केली. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केल्यानंतर संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांनी डिवचलंय. संजय राऊत यांनी गणपत गायकवाड प्रकणावरून किरीट सोमय्या यांच्यावर सडकून टीका करत निशाणा साधलाय. दरम्यान, खुशाल चेष्टा करा पण कोव्हिड काळात केलेल्या घोटाळ्यांचा हिशोब द्यावाच लागणार, असं म्हणत किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलंय. तर एकनाथ शिंदे यांच्याविरोधात काही पुरावे असतील तर कोर्टात जा, असेही किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना उद्देशून म्हटलंय.

Published on: Feb 05, 2024 04:07 PM
झुकेगा नही! माझी चौकशी सुरु असली तरी… राजन साळवी ACB च्या कारवाईवर नेमकं काय म्हणाले?
‘वर्षा’ आणि CM कार्यालयातून गुंड टोळ्यांचं मॉनिटरिंग? मुख्यमंत्री शिंदेंवर कुणाचे गंभीर आरोप?