वंचितची ‘मविआ’त एन्ट्री कधी? लोकसभा जागांबाबत प्रकाश आंबेडकरांशी काय झाली चर्चा? संजय राऊत म्हणाले…

| Updated on: Jan 08, 2024 | 1:04 PM

इंडिया आघाडीच्या जागावाटपाबाबत बोलत असताना संजय राऊत म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांची उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी चर्चा झाली आहे. तर लोकसभा जागांबाबत प्रकाश आंबेडकर यांच्याशी 6 ते 7 वेळा चर्चा झाली आणि ती चर्चा सकारात्मक चर्चा झाली

मुंबई, ८ जानेवारी २०२४ : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं आणि महत्त्वाचं वक्तव्य केले आहे. इंडिया आघाडीच्या जागावाटपाबाबत बोलत असताना संजय राऊत म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांची उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी चर्चा झाली आहे. तर लोकसभा जागांबाबत प्रकाश आंबेडकर यांच्याशी 6 ते 7 वेळा चर्चा झाली आणि ती चर्चा सकारात्मक चर्चा झाली असल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीसाठी अकोला येथील जागा वंचित अर्थात प्रकाश आंबेडकर यांना देण्यावर महाविकास आघाडी यांचं एकमत झालं असल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीकरता वंचितला आणखी कोणत्या जागा द्यायच्या याची चर्चादेखील शेवटच्या टप्प्यात होणार असल्याची महत्त्वाची माहितीही संजय राऊत यांनी दिली.

Published on: Jan 08, 2024 01:04 PM
उपायुक्तांसह अधिकाऱ्यांकडून बलात्कार, महिला पोलिसांच्या ‘लेटरबॉम्ब’मुळे पोलीस दलात खळबळ
अयोध्येतील शरयू नदीच्या तीरावर जंगी तयारी, १००८ शिवलिंगासह १०० कुंडात होणार महायज्ञ