भाजपकडून मविआ सरकार पाडण्यासाठी धमक्या- संजय राऊत

| Updated on: Apr 05, 2022 | 6:01 PM

आम्ही कष्टाच्या पैशातून ही प्रॉपर्टी घेतली आहे. त्यात कोणतंही मनी लॉन्ड्रिंग झालेलं नाही. 2009 मधील ही प्रॉपर्टी आहे. इतक्या वर्षानंतर ईडीला त्यात आता मनी लॉन्ड्रिंग दिसत आहे. या जमिनीच्या व्यवहारासाठी एक रुपया जरी आमच्या खात्यात मनी लॉन्ड्रिंगचा आला असेल आणि मनी लॉन्ड्रिंगच्या पैशातून आम्ही प्रॉपर्टी विकत घेतली असले तर आम्ही ही प्रॉपर्टी भाजपला दान करून […]

आम्ही कष्टाच्या पैशातून ही प्रॉपर्टी घेतली आहे. त्यात कोणतंही मनी लॉन्ड्रिंग झालेलं नाही. 2009 मधील ही प्रॉपर्टी आहे. इतक्या वर्षानंतर ईडीला त्यात आता मनी लॉन्ड्रिंग दिसत आहे. या जमिनीच्या व्यवहारासाठी एक रुपया जरी आमच्या खात्यात मनी लॉन्ड्रिंगचा आला असेल आणि मनी लॉन्ड्रिंगच्या पैशातून आम्ही प्रॉपर्टी विकत घेतली असले तर आम्ही ही प्रॉपर्टी भाजपला दान करून टाकू, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच राजकीय सूड आणि बदल्यासाठीच हा प्रकार सुरू आहे. कोणत्या थराला हे लोक जातात हे तुम्ही पाहात आहात, असं सांगतानाच कारवाई झाली. ठिक आहे. आनंद आहे. असंच करत राहिलं पाहिजे. त्यातून आम्हाला लढण्याची प्रेरणा मिळते, असं  संजय राऊत यांनी (sanjay raut) म्हटलं आहे. भाजपकडून मविआ सरकार पाडण्यासाठी धमक्या दिल्या जात असल्याचं संजय राऊत म्हणालेत.

 

 

आता उद्धव ठाकरे घटना लिहणार का -किरीट सोमय्या
संजय राऊत इतके मोठे नाहीत की त्यांच्यावर भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी प्रतिक्रिया द्यावी – चंद्रकांत पाटील