Sanjay Raut on Chhagan Bhujbal : ‘….तर भुजबळ नक्की मुख्यमंत्री झाले असते’, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Jun 19, 2024 | 1:56 PM

छगन भुजबळ हे एकेकाळी शिवसेनेत होते, नंतर ते राष्ट्रवादीत गेले आता ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत. ते मोठे नेते होते. पण ते शिवसेना या पक्षात नाहीत, असे स्पष्टपणे संजय राऊत यांनी म्हटले. पुढे ते असेही म्हणाले की, पण आता छगन भुजबळ आता शिवसेनेत काही गुप्त चर्चा सुरू आहेत, अशा अफवा पसरवल्या जाताय

Follow us on

लोकसभा निवडणूक आणि आता राज्यसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असूनही संधी न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता छगन भुजबळांची ठाकरे गटाशी चर्चा सुरू असल्याच्या चर्चा सुरू असल्याचे म्हटले जात आहे. यासंदर्भात बोलताना संजय राऊत यांनी हा दावा साफ फेटाळून लावला आहे. ते म्हणाले, छगन भुजबळ हे एकेकाळी शिवसेनेत होते, नंतर ते राष्ट्रवादीत गेले आता ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत. ते मोठे नेते होते. पण ते शिवसेना या पक्षात नाहीत, असे स्पष्टपणे संजय राऊत यांनी म्हटले. पुढे ते असेही म्हणाले की, पण आता छगन भुजबळ आता शिवसेनेत काही गुप्त चर्चा सुरू आहेत, अशा अफवा उठवल्या जात आहेत. त्या अफवा साफ खोट्या आहेत. जर छगन भुजबळ आज कोणत्याही पक्षात टिकून राहिले असते, भले तो कोणताही पक्ष असो शिवसेना किंवा इतर कोणताही पक्ष तर छगन भुजबळ हे नक्कीच मुख्यमंत्री बनले असते, असं स्पष्टपणे संजय राऊत म्हणाले.