Sanjay Raut | कोणी कोणाला भेटण्यावर बंधन नाही, राज ठाकरे-चंद्रकांत पाटील भेटीवर राऊतांचा टोला

| Updated on: Aug 06, 2021 | 2:03 PM

चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजेच ‘कृष्णकुंज’वर ही भेट झाली. उभय नेत्यांमध्ये जवळपास 40 ते 45 मिनिटे चर्चा झाली. राज ठाकरेंना भेटून आल्यानंतर त्यांच्या निवासस्थानाबाहेरुनच चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना राज ठाकरेंसोबतच्या भेटीचा तपशील सांगितला.

जर मुंबईत शिवसेनेची ताकद असेल तर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सेफ जागेवरुन निवडणूक लढवून दाखवावी, असं चॅलेंज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राऊतांना दिलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना त्यांनी राऊतांची खिल्ली उडवत महापालिकेची निवडणूक लढवा, असं चॅलेंज राजसाहेबांच्या अंगणातूनच दिलं. राज ठाकरे-चंद्रकांत पाटील यांच्या भेटीवर संजय राऊत यांनी काहीशी खोचक टिप्पणी केली होती. पत्रकारांनी याच मुद्द्यावर चंद्रकांतदादांना छेडलं. त्यावर चेहऱ्यावर काहीसा राग दाखवत दादांनी राऊतांना थेट निवडणूक लढविण्याचं आव्हान दिलं.

Sanjay Raut | पेगाससवर केंद्र सरकार चर्चा करायला तयार नाही : संजय राऊत
Sanjay Raut | केंद्र सरकार शेतकरी प्रश्नांवर चर्चा करायला तयार नाही : संजय राऊत