Sanjay Raut: “संभाजीराजेंना आम्ही 42 मते द्यायला तयार होतो, मात्र..”
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा करताना संजय राऊत म्हणाले, संजय पवार व मी दोघे अर्ज दाखल करू, यावेळी मुख्यमंत्री स्वत: हजर राहतील.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा करताना संजय राऊत म्हणाले, संजय पवार व मी दोघे अर्ज दाखल करू, यावेळी मुख्यमंत्री स्वत: हजर राहतील. संभाजीराजेंना आम्ही 42 मते द्यायला तयार होतो. मात्र राजेंनी सेनेची ऑफर नाकारली. त्याठिकाणी दुसरा उमेदवार देणं यात कसला विश्वासघात? जागा सेनेची आहे, अपक्षांची नाही. आरोप करतायत त्यांनी नियम कायदा याचा अभ्यास करावा. बदनाम करण्याचा विडा उचलणाऱ्यांचं राजकारणात चांगले होणार नाही. असा इशाराही त्यांनी दिला. तर संभाजीराजेंवरून सेनेवर टीका करणाऱ्या भाजपलाही त्यांही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपने राजेंना मग 42 मते द्यावीत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.