Video : आता आमच्यासाठी सगळं आभाळ खुलंय, शिवसेना अख्ख आकाश कवेत घेणार- राऊत

| Updated on: Jul 08, 2022 | 12:03 PM

आमदारांपाठोपाठ आता बंडखोरांमध्ये नगसेवकांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबवली आणि पुणे येथील नगरसेवक हे शिंदे गटात सहभागी होत आहे. मात्र, हे नगरसेवक नाहीतर माजी नगरसेवक असा उल्लेख संजय राऊत यांनी केला आहे. या महापालिकांवर आता प्रशासकाची नेमणूक झाली आहे. त्यामुळे जे गेले ते नगरसेवक नव्हते. शिवाय अशा अफवा पसरु नका असा […]

आमदारांपाठोपाठ आता बंडखोरांमध्ये नगसेवकांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबवली आणि पुणे येथील नगरसेवक हे शिंदे गटात सहभागी होत आहे. मात्र, हे नगरसेवक नाहीतर माजी नगरसेवक असा उल्लेख संजय राऊत यांनी केला आहे. या महापालिकांवर आता प्रशासकाची नेमणूक झाली आहे. त्यामुळे जे गेले ते नगरसेवक नव्हते. शिवाय अशा अफवा पसरु नका असा सल्ला देऊन आता सर्व राज्य आपल्यासाठी रिकामे आहे. त्यामुळे वाघ आता गरुड झेप घेणार आणि महाराष्ट्र शिवसेनेच्या (Shivsena) कवेत येणार, असे म्हणत शिवसेना ही पक्ष संघटनेवरच भर देणार असल्याचे संकेत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिले आहेत. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत.

 

 

उद्धव ठाकरेंनी मोदींशी चर्चा करून मार्ग काढावा- आमदार शंभूराज देसाई
Video : उद्धव ठाकरे आमच्या कुटुंबाचा भाग- दीपाली सय्यद