आमचे बांध, आमची धरणं आम्ही बांधून ठेवली आहेत; संजय राऊतांचं सूचक वक्तव्य

| Updated on: Jun 19, 2022 | 1:27 PM

शिवसेनेचा आज 56वा वर्धापन दिन आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांना आज संबोधित करणार आहेत. वेस्ट इन हॉटेलमध्ये शिवसैनिकांकडून तयारी करण्यात आली आहे.

शिवसेनेचा आज 56वा वर्धापन दिन आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांना आज संबोधित करणार आहेत. वेस्ट इन हॉटेलमध्ये शिवसैनिकांकडून तयारी करण्यात आली आहे. “आज ते काय बोलतील आणि काय सांगतील याकडे सर्वांचं लक्ष आहे. मतांचा पाऊस पडण्याची गरज नाही. आमचे बांध, आमची धरणं आम्ही बांधून ठेवली आहेत”, असं संजय राऊत म्हणाले. मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावरून रवाना झाले आहेत. वेस्ट इन हॉटेलमधील आमदारांना आणि राज्यातील शिवसैनिकांना ते संबोधित करणार आहेत. त्यामुळे ते काय बोलतील, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Vidhan Parishad Election : ट्रायडंटमध्ये राष्ट्रवादी आमदारांची चाय पे चर्चा
चमत्कार म्हणत नाही, पण भाजपचा विजय नक्की- सुधीर मुनगंटीवार