Sanjay Raut : पंतप्रधानही लोकपाल अंतर्गत यायला हवेत, संजय राऊत यांचं मत
शिवसेना नेते भाजपला टोला लगावण्याची एकही संधी सोडत नाहीत.
मुंबई : शिवसेना आणि भाजप (BJP) नेत्यांमध्ये या न त्या कारणावरुन वार पलटवार टीका टीप्पणी सुरू असते. अशातच शिवसेना नेते भाजपला टोला लगावण्याची एकही संधी सोडत नाहीत. मुंबईतल्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजपला टोला लगावलाय. याआधी त्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (sonia Gandhi) आणि खासदार राहुल गांधी यांना नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी आलेल्या ईडी नोटीसीवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी भाजपला चांगलंच लक्ष्य केलं. तर त्यानंतर त्यांनी लोकपालवर भाष्य केलंय. ते म्हणाले की, ‘काँग्रेसचे अस्तित्व टिकवण्याचे आव्हान तुमच्यापेक्षा आमच्यावर आलंय. पर्याय येतात आणि जातात. मात्र राष्ट्रीय एकात्मतेवर, धर्मनिरपेक्षतेवर घाला घालणारे पर्याय टिकत नाहीत. आता मला वाटतंय की पंतप्रधान पदही लोकपालाच्या कक्षेत यायला हवं, असे म्हणत त्यांनी भाजपवरही निशाना साधला आहे. मुंबईतल्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.