अग्निपथ योजना हा केंद्र सरकारचा मूर्खपणा- संजय राऊत
"या देशात तुघलक होता, त्यानेसुद्धा असा निर्णय घेतला नसेल. देशाचं रक्षण कोणी करायचं हे ज्यांना कळत नाही त्यांच्या हातात देशाची सूत्रं आहेत," अशा शब्दांत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी अग्निपथ योजनेवर टीका केली.
“संपूर्ण देश आज पेटलेला आहे. अग्निवीर.. काय असतं अग्निवीर? खरे अग्निवीर तर समोर बसलेले आहेत. तुम्ही कुठल्या अग्निवीरांची भरती करणार आहात? सैन्यामध्ये आता कंत्राटी पद्धतीनं सैन्य भरणार. सैन्य पोटावर चालतं हे आम्हाला माहित होतं आतापर्यंत. पण आता सैन्य हे कंत्राटी पद्धतीने भरणार आहेत. चार वर्षांचं कंत्राट.. जगाच्या पाठीवर असा मूर्ख निर्णय कोणत्या राज्याने घेतला नाही. या देशात तुघलक होता, त्यानेसुद्धा असा निर्णय घेतला नसेल. देशाचं रक्षण कोणी करायचं हे ज्यांना कळत नाही त्यांच्या हातात देशाची सूत्रं आहेत,” अशा शब्दांत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी अग्निपथ योजनेवर टीका केली.
Published on: Jun 19, 2022 01:51 PM