VIDEO : Sanjay Raut | हवेत गोळीबार करू नका, चंद्रकांत पाटील यांना अफवा पसरवण्याची सवय : संजय राऊत
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याचं नाव घेऊन केलेल्या विधानावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. चंद्रकांत पाटलांनी हवेत गोळीबार करू नये. कोण मंत्री त्याचं नाव सांगावं, असं सांगतानाच पाटलांना अफवा पसरवण्याची सवयच आहे, अशी टिका संजय राऊत यांनी केली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याचं नाव घेऊन केलेल्या विधानावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. चंद्रकांत पाटलांनी हवेत गोळीबार करू नये. कोण मंत्री त्याचं नाव सांगावं, असं सांगतानाच पाटलांना अफवा पसरवण्याची सवयच आहे, अशी टिका संजय राऊत यांनी केली. संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कानाखाली मारली तरी आम्ही सत्ता सोडणार नाही, असं ठाकरे सरकारमधील एका ज्येष्ठ मंत्र्याने मला सांगितलं होतं, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.