Sanjay Raut : कधी काळी नरेंद्र मोदीसुद्धा शरद पवारांसाठी काम करत होते : संजय राऊत

| Updated on: Sep 05, 2021 | 11:04 AM

राऊत पवारांसाठी काम करतात की शिवसेनेसाठी? असा सवालही चंद्रकांतदादांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला होता. त्यावर राऊत यांनी पलटवार केला आहे.

मोदींनीही पवारांसाठी काम केलं

राऊत पवारांसाठी काम करतात की शिवसेनेसाठी? असा सवालही चंद्रकांतदादांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला होता. त्यावरही राऊत यांनी पलटवार केला आहे. कधी काळी नरेंद्र मोदी शरद पवारांसाठी काम करत होते. आज ते देशाचे नेते आहेत. आमचे दोघांचे संबंध आहेत. ते कायम राहतील. शरद पवारांचा पक्ष आणि शिवसेनेची आघाडी आहे. चंद्रकांत दादांनी त्याची चिंता करू नये. सरकार पडणार पडत नाही आणि पडणारही नाही, असंही त्यांनी सांगितलं.

Sanjay Raut | राज्यपालांवर टीका केली नाही, तुमच्या हातात असेल तर आताच अटक करा; संजय राऊतांचं भाजपला आव्हान
Ranganath Pathare | Part 1 | ‘तथाकथित लेखकांनी ब्राह्मण वाचकांसाठी लिहिलं, पाटलाला बाईबाजी करणारं दाखवलं’