देवेंद्र फडणवीसांच्या टीकेवर संजय राऊतांचा पलटवार, ‘… त्यांच्या तोंडाला फेस येईल’
देवेंद्र फडणवीस यांनी पिपाणी वाजवून दाखवावी, त्यांच्या तोंडाला फेस येईल, असं वक्तव्य करत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपकडून मुंबईत भाजप कार्यालयाबाहेर मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी हरियाणाच्या निकालावर आपली प्रतिक्रिया दिली. हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजपने हरियाणात मोठं यश संपादन केलं. या निकालावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस यांनी सकाळच्या भोंग्याला मला विचारायचंय आता कसं वाटतंय? असा खोचक सवाल करत संजय राऊत यांनी डिवचलं होतं. त्यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘त्यांनी मुंबईतील भोंग्याचं महत्त्व समजून घ्यावं. त्यांना मुंबईतील भोंग्याचं महत्त्व जर माहिती नसेल तर ते मराठी माणूस नाही. भाजपमध्ये ज्या पिपाण्या आहेत. त्या वाजत नाहीत. ज्या पिपाण्या आहेत त्या बाहेरच्या, भाड्याच्या असतात. देवेंद्र फडणवीस यांनी पिपाणी वाजवून दाखवावी, त्यांच्या तोंडाला फेस येईल’, असं वक्तव्य करत संजय राऊत यांनी करत जोरदार पलटवार केलाय.