Sanjay Raut : राज ठाकरेंच्या सभेत रिकामी खूर्ची, संजय राऊतांचा पलटवार; म्हणाले, ‘आपल्या सभेत आपण त्यांच्यासाठी…’

| Updated on: Nov 17, 2024 | 5:00 PM

विक्रोळीमधील मनसेच्या सभेला ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. यावर संजय राऊत यांनी पलटवार केलाय. राज ठाकरे यांच्या सभेत माझ्यासाठी खुर्ची, आपल्या सभेत खाट ठेवू, असं म्हणत संजय राऊत यांनी मनसेच्या सभेत खुर्ची ठेवल्यावरून त्यांनी निशाणा साधला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विक्रोळीमधील सभेला ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. इतकंच नाहीतर या मनसेच्या सभेत संजय राऊत यांच्यासाठी एक खूर्चीही रिकामी ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले गेले. दरम्यान, याची माहिती मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी दिली होती. मनोज चव्हाण यांनी संजय राऊत यांच्या मेंदूला गंज लागलाय ते काहीही बोलतात त्यामुळे राजकीय नेत्याने कसे बोलावे हे ऐकण्यासाठी यावं, असं खोचकपणे वक्तव्य करत मनोज चव्हाण यांनी भाष्य केले होते. दरम्यान, यावर संजय राऊत यांनी पलटवार केलाय. राज ठाकरे यांच्या सभेत माझ्यासाठी खुर्ची, आपल्या सभेत खाट ठेवू, असं म्हणत संजय राऊत यांनी मनसेच्या सभेत खुर्ची ठेवल्यावरून त्यांनी निशाणा साधला आहे. ठाकरे आहात तर ठाकरे यांच्याप्रमाणे वागा, असं म्हणत संजय राऊत यांनी राज ठाकरे यांनाच अप्रत्यक्षपणे इशारा दिलाय. ‘मनसेच्या सभेत माझ्यासाठी खुर्ची ठेवली समोर, सन्मानीय संजय राऊत वैगरे… मी म्हटलं आता आपली सभा आहे तर आपण त्यांच्यासाठी खाट ठेवू… कारण २३ तारखेला आपण खाट टाकणारच आहोत.’, असं म्हणत राऊतांनी हल्लाबोल केला.

Published on: Nov 17, 2024 05:00 PM
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं, अर्धा तास गेटवरच अन्…, नेमकं काय घडलं?
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन् त्यांच्याच वाक्याचा उल्लेख करत निशाणा