Sanjay Raut | धर्मांधतेला दूर ठेवून हिंदुत्वाचं राजकारण करता येतं, हे वाजपेयींनी दाखवलं : संजय राऊत
हिंदुत्त्वाच्या विचाराशी तडजोड न करता, हा देश सर्वांचा आहे. देशातील एकात्मता कायम टिकली पाहिजे याच्यावर भर देऊन राजकारण करणारे, धर्मांधता, जातीयता या दोन शब्दांना दूर ठेऊन राजकारण करता येतं हे अटलबिहारी वाजपेयी यांनी दाखवून दिलं, असं संजय राऊत म्हणाले.
अटल बिहारी वाजपेयी हे उत्तम संसदपटू, माणुसकी काय असते, मानवता काय असते हे त्यांच्याकडून पाहिलं, देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांचं काम पाहता आलं, देशाचे नेतृत्त्व पक्षाचं नेतृत्त्व नव्हे, देशाचं नेतृत्त्व कसं असाव हा परिपाठ त्यांच्याकडून घेता आला. हिंदुत्त्वाच्या विचाराशी तडजोड न करता, हा देश सर्वांचा आहे. देशातील एकात्मता कायम टिकली पाहिजे याच्यावर भर देऊन राजकारण करणारे, धर्मांधता, जातीयता या दोन शब्दांना दूर ठेऊन राजकारण करता येतं हे अटलबिहारी वाजपेयी यांनी दाखवून दिलं, असं संजय राऊत म्हणाले.