Sanjay Raut | उद्धव ठाकरे जिथं आहेत तिथून अधिवेशन नियंत्रित करत आहेत : संजय राऊत
राज्य घटनेचे नियम, लोकभावना याच्या विरोधात जाऊन राज्यपालांनी काम करु नये. राजभवनात विद्वत्तेचं अजीर्ण होतंय, असं संजय राऊत म्हणाले. मुख्यमंत्री जिथं आहेत तिथून ते काम करत आहेत. सरकारच्या कामाचं नियंत्रण करत आहेत, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री यांनी राज्यपालांकडे जे उत्तर पाठवलंय ते समोर आहे. मी कालही म्हणालो राज्यपालांनी अभ्यास करु नये. घटनेत जे अधिकार आहेत त्याप्रमाण त्यांनी काम करावं. घटनेचे नियम, सभागृहाचे हक्क, महाराष्ट्राच्या सरकारचे निर्णय, लोकभावना याच्या विरोधात जाऊन राज्यपालांनी काम करु नये. राजभवनात विद्वत्तेचं अजीर्ण होतंय, असं संजय राऊत म्हणाले. मुख्यमंत्री जिथं आहेत तिथून ते काम करत आहेत. सरकारच्या कामाचं नियंत्रण करत आहेत, असं संजय राऊत म्हणाले आहेत.