Sanjay Raut | मुर्ख शब्दाचा जगातील कुठल्याच डिक्शनरीत असा अर्थ होत नाही : संजय राऊत

| Updated on: Dec 13, 2021 | 3:26 PM

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. मी ज्या शब्दाचा वापर केला त्याचा अर्थ मुर्ख आणि बुद्धू असा आहे, असं राऊत म्हणाले. सरकार आणि मान्यताप्राप्त शब्दकोषांमध्ये त्या शब्दाचा अर्थ आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. मी ज्या शब्दाचा वापर केला त्याचा अर्थ मुर्ख आणि बुद्धू असा आहे, असं राऊत म्हणाले. सरकार आणि मान्यताप्राप्त शब्दकोषांमध्ये त्या शब्दाचा अर्थ आहे. मोठ्या साहित्यिकांनी त्याचा अर्थ सांगितला आहे. माझ्या विरोधात दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालय दिल्ली पोलिसांचं (Delhi Police) नेतृत्त्व करते. हा गुन्हा बदल्याच्या  आणि राजकीय बदल्याच्या भावनेतून दाखल करण्यात आला आहे, असं संजय राऊत म्हणाले. सीबीआय (CBI), ईडी (ED), इनकम टॅक्स (Income Tax) माझ्यापर्यंत पोहोचू शकलं नाही. मात्र, या मार्गानं माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असं संजय राऊत म्हणाले.

Published on: Dec 13, 2021 03:26 PM
Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 12 December 2021
Mumbai | मुंबईतील महाकाली दर्शन सोसायटीत 10व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली