Sanjay Raut Live | अमरिंदर सिंग यांचा राजीनामा हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न : संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेनेने परप्रांतींयांच राजकारण कधीच केल नाही, असंही ते म्हणाले. राजकारण कोण करतय हे सर्वांना माहित आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेनेने परप्रांतींयांच राजकारण कधीच केल नाही, असंही ते म्हणाले. राजकारण कोण करतय हे सर्वांना माहित आहे. हा देश आमचा आहे देशातील नागरिक आमचे आहेत, असंही संजय राऊत म्हणाले. कोणी कितीही हवेत गोळीबार केला तरी त्या गोळ्या त्यांच्यावरच येऊन पडतील, असं संजय राऊत म्हणाले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिलेला राजीनामा हा काँग्रेसचा अंतर्गत विषय असून त्यावर बोलण्याची गरज नाही, असंही ते म्हणालेय. विरोधकांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर थोडे दिवस थांबा सगळ्या गोष्टी समोर येतील, असंही संजय राऊत म्हणाले.