Sanjay Raut | गोवा, यूपीत शिवसेना निवडणुका लढवणार : संजय राऊत -tv9
कधी काळी गोव्यात भाजपचाही सरपंचही नव्हता, सरपंच काय पंचही नव्हता, गोमंतक पक्ष फोडून ते निवडून येऊ लागले असे म्हणत राऊतांनी प्रमोद सावंत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
मुंबई : शिवसेनेच्या पाच राज्यातील निवडणुका लढण्याबाबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विचारलं असता, पाच राज्यात शिवसेनेचा सरपंचही नाही. अशी टीका त्यांनी केली होती, सावंतांच्या याच वक्तव्याचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे, कधी काळी गोव्यात भाजपचाही सरपंचही नव्हता, सरपंच काय पंचही नव्हता, गोमंतक पक्ष फोडून ते निवडून येऊ लागले असे म्हणत राऊतांनी प्रमोद सावंत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. दादरा-नगरहवेतीलही आमचा सरपंच नव्हाता तरी आम्ही जिंकलो, सरपंच असल्याचा नसल्याचा विधानसभेत काही फरक पडत नाही, आम्ही आधी विधानसभा जिंकू, मग सरपंच आपोआप होतील असा टोलाही त्यांनी लगावला आहे.