कानगोष्ट माईकने ऐकली! ‘नो क्वेशन आन्सर’
आजच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केसीआर यांच्या भेटीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलं होते. सकाळपासून या भेटीने राजकारणातला सस्पेन्स वाढवला होता. मात्र काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री आणि राव यांनी पत्रकार परिषदेत घेत चित्र उघड केले.
आजच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केसीआर यांच्या भेटीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलं होते. सकाळपासून या भेटीने राजकारणातला सस्पेन्स वाढवला होता. मात्र काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री आणि राव यांनी पत्रकार परिषदेत घेत चित्र उघड केले. भाजपविरोधात देशात सध्या विरोधी पक्षाची मोट बांधण्याचे मनसुबे त्यांनी बोलून दाखवले. मात्र या पत्रकार परिषदेला सुरूवात होतानाच संजय राऊत राव यांच्या कानात जे बोलले ते बरोबर माईकने पकडे आहे. त्यामुळे आता राऊत यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होऊ लागला आहे.