Sanjay Raut : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचाही खारीचा वाटा, शिवसेना नेते संजय राऊतांची प्रतिक्रिया

| Updated on: Jul 22, 2022 | 11:51 AM

'देशाच्या राष्ट्रपतीपदावर द्रौपदी मुर्मू विराजमान झाल्या आहेत. त्यात शिवसेनेचाही खारीचा वाटा आहे. त्यांनी संविधानाचं रक्षण करावं. दलित आदिवासींना न्याय देण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे,' अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिलीय.

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी पुन्हा देशाच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्यावर विजयावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘देशाच्या राष्ट्रपतीपदावर द्रौपदी मुर्मू विराजमान झाल्या आहेत. त्यांना देशभरातून मोठं मतदान झालं. त्यात शिवसेनेचाही खारीचा वाटा आहे. देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती होण्याचा मान त्यांना मिळाला. त्या संविधानाच्या चौकीदार आहेत. त्यांनी संविधानाचं रक्षण करावं. दलित आदिवासींना न्याय देण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे. ही जबाबदारी त्यांनी पार पाडावी,’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची काल ईडीकडून (ED) चौकशी झाली. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची संपत्ती ईडीने जप्त केली. तसेच शिवसेना नेते संजय राऊत यांना स्वत:लाही ईडीने समन्स बजावलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

Published on: Jul 22, 2022 11:51 AM
Sanjay Raut : सोनिय गांधी यांच्या चौकशीनंतर राऊतांची टीका, तपास यंत्रणांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप
Sanjay Raut : आदित्य ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर, तरुणांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळतोय, संजय राऊतांची प्रतिक्रिया