नरेंद्र मोदींनी दादरा नगर हवेलीला यावं, प्रशासन इथल्या लोकांना गुलामासारखं वागवतंय ते पाहावं: संजय राऊत

| Updated on: Oct 16, 2021 | 1:44 PM

मोहन डेलकर यांनी मुंबईत येऊन आत्मबलिदान दिलं. येथील व्यवस्थेनं मोहनभाई यांच्या सारख्या तेज तर्रार नेत्याचा जीव घेतला. अभिनव यांना पाहिल्यावर मोहन डेलकर यांची आठवण येते, असं संजय राऊत म्हणाले.

मोहन डेलकर यांनी मुंबईत येऊन आत्मबलिदान दिलं. येथील व्यवस्थेनं मोहनभाई यांच्या सारख्या तेज तर्रार नेत्याचा जीव घेतला. अभिनव यांना पाहिल्यावर मोहन डेलकर यांची आठवण येते, असं संजय राऊत म्हणाले. सिल्वासा आणि दादरा नगर हवेली कित्येक वर्षानंनतर स्वतंत्र झालेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आझादी का अमृत महोत्सव साजरा करत आहेत. त्यांना मी येथील प्रशासन कसं काम करतंय हे पाहण्यासाठी बोलवतोय. येथील लोकांना गुलांमासारखं वागवलं जातंय. लोक या सत्ताधीशांपेक्षा पोर्तुगीज बरे असं म्हणायला लागले आहेत. शिवसेना येथील लोकांच्या पाठिशी उभं राहणार आहे. मोहन डेलकर यांना न्याय मिळावा म्हणून दादरा नगर हवेलीतील पोटनिवडणुकीत उमदेवार दिला आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

दादरा नगर हवेलीतील प्रशासनाची दहशत मोडून काढण्यासाठी शिवसेना साथ देईल. इथल्या दहशतीला संपवून जाणार असल्याचं संजय राऊत म्हणाले. इथल्या जनतेच्या विकासासाठी शिवसेना त्यांच्या पाठिशी उभे राहिलं, असं संजय राऊत म्हणाले. देशात सध्या केंद्रातील मंत्र्यांना कोणतंही काम राहिलेलं नाही. त्यामुळं दादरा नगर हवेलीच्या पोटनिवडणुकीत रेल्वे मंत्री तळ ठोकून बसले आहेत. रेल्वे विकून टाकली त्यामुळं रेल्वेमंत्री दादरा नगर हवेलीत आले आहेत. इथं इतरही मंत्री येतील. बंगालमध्येही गेले होते. तिथं त्यांचं काय झालं. भाजपनं दादरा नगर हवेलीच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराला जो बायडन यांना आणावं असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

पुढे उमेदवारी मिळणं अशक्य, मला तुमच्या चित्रपटात तरी भूमिका द्या, गिरीश महाजनांची टोलेबाजी
Nitesh Rane | ‘..तर उद्धव ठाकरेंना आधी गेट आऊट केलं असतं’, नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल