Sanjay Raut | तुम्ही कायद्याचे पण मालक झालात का ? संजय राऊत यांचा भाजप नेत्यांना सवाल

| Updated on: Nov 07, 2021 | 2:00 PM

ईडी, सीबीआय आणि एनसीबी ज्याप्रकारे काम करीत आहेत ते पाहता देशातील तपासयंत्रणा आणि तुरुंगांचेही खासगीकरण झाले काय, असा प्रश्न पडत असल्याची खोचक टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

दिवाळीनंतर महाराष्ट्रातील आणखी काही मंत्र्यांना तुरुंगात पाठवू अशी वाचाळकी भाजपचे लोक रोज करतात. तसेच ईडी, सीबीआय आणि एनसीबी ज्याप्रकारे काम करीत आहेत ते पाहता देशातील तपासयंत्रणा आणि तुरुंगांचेही खासगीकरण झाले काय, असा प्रश्न पडत असल्याची खोचक टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातील ‘रोखठोक’ या सदरातून संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केले आहे.

देशातील अनेक सार्वजनिक उपक्रमांचे खासगीकरण मोदी यांच्या सरकारने केले. अनेक सरकारी कंपन्या आपल्या मर्जीतील उद्योगपतींना विकण्यात आल्या. ‘‘दोघेजण विकायला बसलेत व दोघेच जण खरेदी करतात,’’ अशी टवाळी त्यावर सुरू आहे. आता रेल्वेपासून एअर इंडियापर्यंत सगळेच खासगी झाले. त्याचवेळी महाराष्ट्रात याला तुरुंगात टाकू व त्यालाही तुरुंगात टाकू, असे भाजपचे नेते रोज सकाळी उठून सांगतात. तेव्हा देशातील तुरुंगांचेही खासगीकरण झाले काय? असा प्रश्न पडतो. मोदी है तो मुमकीन है! हे अशा वेळी खरे वाटते. 2024 पर्यंत हे सहन करावेच लागेल. संपूर्ण देशच हळूहळू तुरुंग होताना दिसत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली.

Published on: Nov 07, 2021 01:48 PM
Nawab Malik | व्हिलन तुरुंगात जात नाही, तोपर्यंत पिक्चर सुरुच राहणार : नवाब मलिक
Mumbai | मुंबईतील वरळीत होणाऱ्या कोस्टल रोडविरोधात कोळी बांधवांचं आंदोलन