Sanjay Raut Live | 12 आमदाराच्या संदर्भात राज्यपालांनी घेतलेली भूमिका ही राजकीय, त्यांनी प्यादं बनू नये- राऊत

| Updated on: Aug 14, 2021 | 12:14 PM

“हा सगळा खेळ ठरवून चाललेला आहे. राज्यपाल स्वतःच्या मर्जीने या सगळ्या गोष्टी करत नाहीत, त्यांच्यावर दबाव आहे, तो दबाव कोठून असू शकतो हे आपल्याला माहिती आहे”, असं म्हणत संजय राऊतांनी केंद्राकडे बोट दाखवलं.

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी रखडलेल्या 12 आमदारांच्या नियुक्तीवरुन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यासह केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. “हा सगळा खेळ ठरवून चाललेला आहे. राज्यपाल स्वतःच्या मर्जीने या सगळ्या गोष्टी करत नाहीत, त्यांच्यावर दबाव आहे, तो दबाव कोठून असू शकतो हे आपल्याला माहिती आहे”, असं म्हणत संजय राऊतांनी केंद्राकडे बोट दाखवलं.

राज्यपालांनी राजकारणातलं प्यादे बनू नये, राज्यांच्या अधिकारावर, कॅबिनेटच्या अधिकारावर जर ते अतिक्रमण करत असतील, तर देशाच्या अधिकारांवर संघराज्यवर हल्ला आहे. 12 आमदारांबद्दल त्यांनी घेतलेली भूमिका ही राजकीय आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

Published on: Aug 14, 2021 11:57 AM
Milind Narvekar | मिलिंद नार्वेकर यांना व्हॉट्सॅपवरुन धमकी प्रकरणावर गुन्हे शाखेकडून तपास सुरु
Nitin Gadkari |… तर राष्ट्रीय महामार्गांबद्दल वेगळा विचार करावा लागेल, नितीन गडकरींचा ठाकरे सरकारवर लेटरबॉम्ब