Ladki Bahin Yojana : राऊतांच्या ‘त्या’ विधानानं महिलांमध्ये चिंता, ‘लाडक्या बहिणीं’ना 1500 रूपये मिळणार की नाही?
'विधानसभा निवडणुकीला दोन महिन्यांचा कालावधी उरला आहे. त्यानंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही. या लाडक्या बहिणींची काळजी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनाच घ्यावी लागणार आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना लाडक्या बहिणींचा जो उमाळा आला'
राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची महिलावर्गात मोठी चर्चा आहे. महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत असून अर्ज देखील मोठ्या प्रमाणत येत आहेत. अशातच संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केले आहे. राऊत म्हणाले, विधानसभा निवडणुकीला दोन महिन्यांचा कालावधी उरला आहे. त्यानंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही. या लाडक्या बहिणींची काळजी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनाच घ्यावी लागणार आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना लाडक्या बहिणींचा जो उमाळा आला आहे, तो केवळ दोन महिन्यांसाठी आहे. दोन महिने त्यांच्या खात्यात पैसे टाकतील. महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर उभा करतील आणि मग हे तिघेही पळून जातील अशी जिव्हारी लागणारी टीका राऊतांनी सरकारवर केली. तर लाडक्या बहिणी योजनेचा पैसा हा सरकारी तिजोरीतील आहे. तर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि फुटलेल्या आमदारांसाठीचा पैसा हा ठेकेदारीचा पैसा असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.