Saamana : भाजपच्या अमृतकाळात महाराष्ट्रात एक जुगार बचावो मंत्रालय सुरू होणार? सामनातून नेमका काय हल्लाबोल?
सामनातून बुंद से गयी वो… या शीर्षकाखाली अग्रलेख प्रसिद्ध करण्यात आलाय. भाजपचे कुळे यांची 'मुळे' मकाऊच्या कॅसिनो महालात पोहोचली. याचे समर्थन आज भाजपचे दुधखुळे करीत आहेत. मकाऊच्या कुळ्यांची पाठराखण...सामनातून नेमका काय केला हल्लाबोल
मुंबई, २३ नोव्हेंबर २०२३ : संजय राऊत यांनी चीनमधील मकाऊच्या एका कॅसिनोमध्ये एक व्यक्ती जुगार खेळत असल्याचा दावा केला. मात्र ती व्यक्ती चंद्रशेखर बावनकुळे आहे, असं त्यांनी म्हटलं नसलं तरी यावर बावनकुळे आणि फडणवीस यांनी भाष्य केले. तर आता थेट सामनातून बुंद से गयी वो… या शीर्षकाखाली अग्रलेख प्रसिद्ध करण्यात आलाय. भाजपचे कुळे यांची ‘मुळे’ मकाऊच्या कॅसिनो महालात पोहोचली. याचे समर्थन आज भाजपचे दुधखुळे करीत आहेत. मकाऊच्या कुळ्यांची पाठराखण करण्यासाठी इतरांवर बदनामीचे शेण उडवून धमक्या वगैरे दिल्या जात आहेत. पण भाऊ एक मात्र नक्की, या लोकांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा मकाऊछाप जुगार करून राज्य बदनाम केले आहे, असा आरोप सामनातून करण्यात आलाय. तर महाराष्ट्रात आता एक जुगार बचावो मंत्रालय सुरू तर होणार नाही ना? भाजपच्या अमृतकाळात काहीही घडू शकते, असे म्हणत खोचक टोलाही लगावला आहे.