Special Report | महाविकास आघाडीचे काही मंत्री भाजपविरोधात मवाळ आहेत?
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांवर जहरी टीका केली. राऊत यांनी यासोबतच ठाकरे सरकारचा मंत्र्यांना एक आवाहन केलंय.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांवर जहरी टीका केली. राऊत यांनी यासोबतच ठाकरे सरकारचा मंत्र्यांना एक आवाहन केलंय. ज्याप्रमाणे शिवसेना भाजपला अंगावर घेते त्याचप्रमाणे भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर देण्याचे सल्ले राऊत यांनी इतर पक्षांच्या मंत्र्यांना दिले. तसेच संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना भाजपवर टीका केली. चंद्रकांतदादांनी पवारांचा एकेरी उल्लेख केला. शोभतं का हे त्यांना. कुठे हिमालय आणि कुठे टेकाड, टेंगूळ. तुम्हाला बोलायचंच आहे तर अतिरेक्यांसदर्भात बोला. त्यांना दम द्या. तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवू नका, असा हल्लाच राऊत यांनी चढवला.
Published on: Oct 18, 2021 09:14 PM