Saamana : घटनाबाहय सरकार महाराष्ट्रावर मोदी-शहांनी लादले अन्… सामनातून सरकारवर ताशेरे
VIDEO | अहंकाराचा नाश होईल! अशा शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध करण्यात आलाय. महाराष्ट्राचे अमंगल करणारे एक बेकायदेशीर, घटनाबाहय सरकार शिवरायांच्या महाराष्ट्रावर मोदी-शहांनी लादले आहे. दसरा मेळाव्यापूर्वीच संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा
मुंबई, २४ ऑक्टोबर २०२३ | राज्यावर अमंगल करणारे बेकायदेशीर सरकार मोदी-शहांनी लादले आहे, असे म्हणत आजच्या सामना या वृत्तपत्रातून केंद्रीय मंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका करण्यात आली आहे. तर सत्तेचा माज, अहंकार अशाच पद्धतीने रावणाच्या नसानसांत उसळत होता, असेही म्हणत सामनातून हल्लाबोल करण्यात आलाय. अहंकाराचा नाश होईल! अशा शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध करण्यात आलाय. महाराष्ट्राचे अमंगल करणारे एक बेकायदेशीर, घटनाबाहय सरकार शिवरायांच्या महाराष्ट्रावर मोदी-शहांनी लादले आहे. सत्तेचा माज व अहंकार अशाच पद्धतीने रावणाच्या नसानसांत उसळत होता. त्या अहंकाराचा नाश शेवटी दसऱ्याच्या दिवशी झाला, असे म्हटले आहे. तर शिवतीर्थावर ‘राम-लीला’ साजरी होईल. अहंकारी रावणाचे दहन होईल, महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त होईल व भारत देश सूडाच्या फासातून मुक्त होईल, असेही सामनातून म्हटलंय.