‘तुम्ही सिंघम ना, तेव्हा कुठे होते? आता राष्ट्रपतींनी तुम्हाला परमवीर चक्र द्यायचं का?’, राऊतांचा शिंदे, फडणवीस, अजितदादांवर घणाघात

| Updated on: Oct 13, 2024 | 12:05 PM

'तुम्ही अक्षय शिंदेची हत्या केली ना, पोलिसांनी. सिंघम ना. मग सिंघम अशावेळी कुठे असतात. हे जे तीन-तीन सिंघम महाराष्ट्राला लाभले आहेत', बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी संजय राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.

प्रश्न एसआरचा असेल किंवा अन्य काही असेल. पण मुंबईत हत्या झाली आहे म्हणजे तुम्ही कायदा-सुव्यवस्था राखण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहात, असे म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. तर या राज्यात गुंडांचीही अशाप्रकारे हत्या कामा नये. अक्षय शिंदेंची हत्या केली. तुम्ही सिंघम ना, मग अशावेळी सिंघम कुठे असतात? असे म्हणत संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधलाय. पुढे राऊत असेही म्हणाले की, हे जे तीन-तीन सिंघम महाराष्ट्राला लाभले आहेत. एक मुख्य सिंघम, दोन डेप्युटी सिंघम, हे तीन तीन सिंघम, बलात्कार हत्या होताना कुठे असतात. एका अक्षय शिंदेला मारलं आणि स्वत:ला सिंघम म्हणून घोषित केलं. तुम्हाला काय राष्ट्रपतींनी परमीवर चक्र द्यायचं का? असा खोचक सवालही राऊतांनी देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलाय. तर एकनाथ शिंदे यांचा पोलीस खात्यातील हस्तक्षेप आहे. गुंड टोळी चालवावी असं पोलीस दल हाताळत आहेत. फडणवीस हतबल आहेत. त्यांनी मंत्रिमंडळात राहू नये. गुंड टोळ्या जशा चालवल्या जातात, तसं शिंदे पोलिसांचा वापर करत आहे. दोन महिन्यात या खाकी टोळ्यांचा बंदोबस्त केला जाईल. मोदी आणि शाह तुम्हाला हंटर घेऊन पळवत आहे. तुम्ही पळत आहात, असा घणाघातही राऊतांनी केला.

Published on: Oct 13, 2024 12:05 PM