Sanjay Raut : हे अडाणी घोडे उजळलेले, महायुतीच्या विजयावरून सरकारवर निशाणा, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Nov 07, 2023 | 2:57 PM

नुकत्याच राज्यात ग्रामपंचायत निवडणुका झाल्या आणि त्याचा निकाल काल समोर आला. यावरून संजय राऊत यांनी निशाणा साधलाय. ग्रामपंचायतीच्या निवडणुका या पक्ष आणि चिन्हावर लढवल्या जात नाही. हे जर घटनाबाह्य सरकारला माहिती नसेल तर हे अनाड्यांचं सरकार आहे, राऊत यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.

मुंबई, ७ नोव्हेंबर २०२३ | सुरूवातीपासून जनतेने टीका-टिप्पणी आरोप नाकारत सामान्य नागरिकांनी महायुतीला कौल दिला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ज्या लोकांनी जनतेशी बेईमानी केली या लोकांना नाकारत महायुतीला विजयी केले असे मुख्यमंत्री म्हणाले. यावर संजय राऊत यांनी निशाणा साधलाय. ग्रामपंचायतीच्या निवडणुका या पक्ष आणि चिन्हावर लढवल्या जात नाही. हे जर घटनाबाह्य सरकारला माहिती नसेल तर हे अनाड्यांचं सरकार आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी खोचक टीका केली आहे. तर हे अडाणी घोडे उजळलेले आहेत. आम्ही जिंकलो असे म्हणत आहेत. या निवडणुका सर्वच राजकीय पक्ष विरोधक एकत्र येऊन पॅनल पद्धतीने गावच्या विकासासाठी ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढतात. त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात पंचायत राज समजून घेतले पाहिजे, असे म्हणत संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.

Published on: Nov 07, 2023 02:57 PM
Shahaji Bapu Patil : …तर शिवसैनिकांची अवलाद सांगणार नाही, शहाजीबापूंना कुणी दिलं ओपन चॅलेंज
एकनाथ खडसे यांच्या प्रकृतीसाठी शिवसेना नेत्यानं काय केली प्रार्थना?