‘दावोसला जाण्यापेक्षा गुजरातला जा’, संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
फॉक्सकॉन वेदांता असेल, ड्रग्स पार्क असेल, एअर बस हे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेले ते महाराष्ट्रात परत आणा....त्यामुळे दावोसला जाण्यापेक्षा गुजरातला जा, असा हल्लाबोलही संजय राऊत यांनी केला आहे.
मुख्यंमत्री एकनाथ शिंदे रविवारी दावोसच्या दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दावोसमधून राज्यासाठी मोठी गुंतवणूक आणणार असल्याचे म्हटले. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
‘तुमच्या नाकासमोर राज्यातील प्रकल्प पळवले. त्यामुळे राज्याचे नुकसान झाले आहे. गुंतवणूक गेली आणि रोजगारही गेले. त्यामुळे दावोसला जाण्याआधी गुजरातला जा’, असे म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना माध्यमांशी बोलताना खोचक टोला लगावला आहे. यासह फॉक्सकॉन वेदांता असेल, ड्रग्स पार्क असेल, एअर बस हे प्रकल्प महाराष्ट्रात आले होते. ते तुमच्यासमोरून कोणी तरी खेचून नेले. त्यामुळे दावोसला जाण्यापेक्षा गुजरातला जा. गुजरातने नेलेले प्रकल्प महाराष्ट्रात घेऊन या, असा हल्लाबोलही संजय राऊत यांनी केला आहे.
Published on: Jan 16, 2023 11:12 AM