Sanjay Raut : काय उखडायचं ते उखडा… देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलताना संजय राऊत यांची जीभ घसरली

| Updated on: Oct 20, 2023 | 3:39 PM

VIDEO | ड्रग्स प्रकरणातील नेक्सस उघड होईल असं भाष्य राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते, यावर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस यांनी ड्रग्ज प्रकऱणातील नेक्सस उघडं होईल, असा सूचक वक्तव्य केल्यानंतर संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

नाशिक, २० ऑक्टोबर २०२३ | ड्रग्ज प्रकऱणातील नेक्सस उघडं होईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. यावर संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. नेक्सस उघड झालं आहे. फडणवीस यांच्याकडे लक्ष देऊ नका. ते भरकटल्यासारखे बोलत आहेत. ते भांग पित नसतील, पण त्या वासाने त्यांना नशा येत असेल. त्यांच्या आसपास जी माणसं आहेत ना या नशेच्या बाजारात फिरत आहेत. त्या नशेबाजांमुळे फडणवीस यांची मती गुंग झाली आहे. कसले नेक्सस उघड होणार आहे? तुम्ही गृहमंत्री आहात. एक पिढी बरबाद होताना दिसत आहे आणि तुम्ही राजकारण करताय? असा थेट सवाल राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. पुढे राऊतांनी गृहमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय. असे गृहमंत्री लाभले हे राज्याचं दुर्देव आहे. अनेक चांगले गृहमंत्री पाहिले, बाळासाहेब देसाईंसारखे गृहमंत्री राज्यात होऊन गेले. सुडाने कोणीही कारवाई केली नाही. आजुबाजूला बसलेल्या माफियांची तुम्ही बाजू घेता धन्य आहात तुम्ही… गृहमंत्र्यांकडे विरोधकांची माहिती असते. फक्त ड्रग्ज माफियांची माहिती नाही. काय उखडायचे ते उखडा? काय करणार आहात तुम्ही? कुणाची बाजू घेत आहात? ड्रग्स गुजरातमधून येतंय त्यांची बाजू घेताय? असे अनेक सवाल राऊतांनी फडणवीसांना केलेत.

Published on: Oct 20, 2023 03:39 PM
Gulabrao Patil : …तर नक्कीच दाल में कूछ काला है, एकनाथ खडसे यांच्यावरील कारवाईवर गुलाबराव पाटील काय म्हणाले?
Pune Loksabha : पुण्यात वसंत मोरे यांना टफ फाईट मिळणार? ‘हा’ नेताही लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार