Sanjay Raut : ‘ती हिंमत शिंदेंमध्ये नाही, ते 100 टक्के…’, फडणवीस अन् अजितदादांना शुभेच्छा देत राऊत काय म्हणाले?
एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही? याबाबतची अद्याप स्पष्टता आलेली नाही. यासंदर्भात संजय राऊत यांना सवाल केला असता ते म्हणाले, एकनाथ शिंदे १०० टक्के...
महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी आज होणार आहे. तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ देवेंद्र फडणवीस हे घेणार आहेत. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही? याबाबतची अद्याप स्पष्टता आलेली नाही. यासंदर्भात संजय राऊत यांना सवाल केला असता ते म्हणाले, एकनाथ शिंदे १०० टक्के आज शपथ घेतील. त्यांच्याकडे दुसरा कोणता पर्याय राहिलेला नाही. कारण दिल्लीशी पंगा घेण्याची हिंमत त्यांच्यात नाही. अडीच तीन वर्षांपूर्वी त्यांच्यात हिंमत नव्हती म्हणून त्यांनी पक्ष सोडला, असं म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. तर मागच्या अडीच वर्षात राज्यातील संपत्तीवर दरोडे पडले. मात्र आता राज्याची लूट न होण्याची जबाबदारी नव्या मुख्यमंत्र्यांची असेल, असे म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा दिल्यात. पुढे ते असेही म्हणाले, अजित पवार यांचं राजकारण वेगळं आहे. त्यांनी दिल्लीसोबत व्यवस्थित जुळून घेतलं आहे. दिल्लीने त्यांच्यावर काही जबाबदाऱ्या टाकल्या आहेत. पुढील ५ वर्ष राज्यात धुमशान बघायला मिळेल, त्यात महाराष्ट्राचं हित किती हे पाहायला मिळेल, असं म्हणत अजित पवारांचं राऊतांनी कौतुकच केल्याचे दिसले.