Saamana | देणाऱ्यांनाच हुकूमशहा ठरवलं, सामानातून शिंदे गट अन् अजितदादा गटावर सडकून टीका

| Updated on: Oct 11, 2023 | 10:24 AM

VIDEO | फुटिरांच्या हाती पक्ष आणि चिन्ह सोपवणे हाच हुकूमशाही पद्धतीचा कारभार असल्याचे म्हणत मिंधे गट आणि अजित पवार गटाने देणाऱ्याचे हातच घेतले आहे, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रातून शिंदे गट आणि अजित पवार गटावर निशाणा

मुंबई, ११ ऑक्टोबर २०२३ | फुटिरांच्या हाती पक्ष आणि चिन्ह सोपवणे हाच हुकूमशाही पद्धतीचा कारभार असल्याचे म्हणत मिंधे गट आणि अजित पवार गटाने देणाऱ्याचे हातच घेतले आहे, असे म्हणत ठाकरे गटाचं मुखपत्र सामना या वृत्तपत्रातून शिंदे गट आणि अजित पवार गटावर निशाणा साधण्यात आला आहे. मिंधे अजित पवार गटाने देणाऱ्याचे हातच घेतले व देणाऱ्यांना हुकूमशहा ठरवून मोकळे झाले, असे म्हणत संजय राऊत यांनी सामनातून हल्लाबोल केला आहे. ‘आमदार फुटले म्हणजे पक्ष फुटला असे होत नाही, असे निरीक्षण देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. तरीही फुटिरांच्या हाती पक्ष व चिन्ह सोपवणे हाच हुकूमशाही पद्धतीचा कारभार आहे. अशा निवडणूक आयोगासमोर शरद पवार यांना हुकूमशहा ठरवले जाते व उद्धव ठाकरे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. ठाकरे-पवार यांच्या कारभाराने अनेक दगडांना शेंदूर फासून त्यांना देवत्व दिले. पण मिंधे अजित पवार गटाने देणाऱ्याचे हातच घेतले व देणाऱ्यांना हुकूमशहा ठरवून मोकळे झाले.’, असे सामनातून म्हणत शिंदे गटासह अजित पवार गटावर सडकून टीका केली आहे.

Published on: Oct 11, 2023 10:24 AM
राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांची धमकी, गुणरत्न सदावर्ते यांनी काय दिला इशारा
Raj Thackeray यांच्या जाळपोळीच्या इशाऱ्यानंतर मुलुंडचा टोल जाळला? केबिन पेटवणारे कोण? हे अद्याप अस्पष्ट