हिशोब तर द्यावाच लागणार! संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांची नक्कल करत भाजपला डिवचलं
संजय राऊत यांनी भाजपच्या किरीट सोमय्या यांची नक्कल करत टिकास्त्र डागलंय. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केल्याने नवा वाद निर्माण झालाय. यावर भाजपने भूमिका मांडवी यासाठी विरोधक भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताय. हिशोब तर द्यावाच लागणार...
मुंबई, ६ फेब्रुवारी २०२४ : भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या किरीट सोमय्या यांची नक्कल करत टिकास्त्र डागलंय. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केल्याने नवा वाद निर्माण झालाय. यावर भाजपने भूमिका मांडवी यासाठी विरोधक भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताय. हिशोब तर द्यावाच लागणार…या वाक्याने ज्या डझनभर विरोधी नेत्यांवर भाजपच्या किरीट सोमय्यांनी आरोप केलेत त्याच वाक्याचा आधार घेत संजय राऊत यांनी भाजपला डिवचलं. किरीट सोमय्यांची नक्कल करत भाजपचे आमदार गणपत गायकवाड गोळीबारानंतर मुख्यमंत्र्यांवर आरोप केलेत त्याची चौकशी कधी होणार? असा सवाल करत राऊतांनी हल्लाबोल केलाय. तर संजय राऊत यांनी गणपत गायकवाड प्रकणावरून किरीट सोमय्या यांच्यावर सडकून टीका करत निशाणा साधलाय. दरम्यान, खुशाल चेष्टा करा पण कोव्हिड काळात केलेल्या घोटाळ्यांचा हिशोब द्यावाच लागणार, असं म्हणत किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलंय