Sanjay Raut : भाजप गुंड आणि गुन्हेगारांचा पोशिंदा, संजय राऊत यांनी काय केली सडकून टीका?
VIDEO | ललित पाटील कोण आहे हे आम्हाला माहितीही नव्हतं, असे म्हणत संजय राऊत यांनी सरकारवरच सडकून टीका केली. ज्यांच्यावर ईडी आणि सीबीआयचे खटले होते तेच तुमच्याकडे आहे ना, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजप आणि सरकारवर जोरदार हल्लबोल केला आहे. बघा काय केली टीका
मुंबई, २२ ऑक्टोबर २०२३ | ललित पाटील कोण आहे हे आम्हाला माहितीही नव्हतं, असे म्हणत संजय राऊत यांनी सरकारवरच सडकून टीका केली. राऊत म्हणाले, आता जे पोपट बोलत आहेत. ते घाबरून बोलत आहेत. त्यांना घाम फुटला आहे. इकडे तिकडे ते आरोप करत सुटले आहेत. नाशिकसह राज्यातील गुन्हेगारांना कोण पोसतंय? असा सवाल संजय राऊत यांनी करत ज्यांच्यावर ईडी आणि सीबीआयचे खटले होते तेच तुमच्याकडे आहे ना. तुम्ही गुंडांचे पोशिंदे आहात, तुम्ही त्यांना पोसत आहात, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजप आणि सरकारवर जोरदार हल्लबोल केला आहे. तर अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, भावना गवळी, राहुल शेवाळे, प्रताप सरनाईक यांच्यासह तुम्हाला माहीत असलेले आरोपी तुम्ही पक्षात घेतले. त्यांना मंत्रिमंडळात बसवलं. ज्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. हिंमत असेल तर आधी यांना सरळ करा, असे म्हणत संजय राऊत यांनी इशारा दिलाय.