दोन मुडदे पडलेत आणि आरोपीला पिझ्झा-बर्गर… पुणे अपघात प्रकरणी संजय राऊत आक्रमक

| Updated on: May 21, 2024 | 5:39 PM

जो माजोरडा, दारूडा जो बिल्डरचा मुलगा आहे. तो दारू पितांना दिसतोय सीसीटीव्ही फुटेज व्हिडीओमध्ये दिसतंय तरी तुम्ही त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह देताय? कोणी केलं हे सगळं? भ्रष्ट पोलीस यंत्रणा आणि एक भ्रष्ट आमदार... असे म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली

पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी कोणाला मदत केली? दोन निष्पाप लोकांचे बळी गेलेत. जो माजोरडा, दारूडा जो बिल्डरचा मुलगा आहे. तो दारू पितांना दिसतोय सीसीटीव्ही फुटेज व्हिडीओमध्ये दिसतंय तरी तुम्ही त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह देताय? कोणी केलं हे सगळं? भ्रष्ट पोलीस यंत्रणा आणि एक भ्रष्ट आमदार… असे म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली तर पुणे पोलीस आयुक्तांच्या समोर पुण्यातील जनतेने आंदोलन करायला हवं, असे आवाहनही राऊतांनी पुणेकरांना केलं. तर बाजूला दोन मुडदे पडलेले असताना आरोपीला पोलीस ठाण्यात पिझ्झा, बर्गर खायला घालताय. खोटा मेडीकल रिपोर्ट देताय, असा हल्लाबोल करत त्या आरोपी मुलाच्या पालकांवर गुन्हा दाखल व्हायला हवा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. अशा लोकांवर पुणेकरांनी सामाजिक बहिष्कार घातला पाहिजे. असे आयुक्त जर पुण्याला लाभले असतील तर पुण्याला लागलेला तो कलंक आहे, असे म्हणत राऊतांनी पुणे अपघात प्रकरणावर हल्लाबोल केलाय.

Published on: May 21, 2024 05:39 PM
Bhiwandi Lok Sabha Constituency : कपिल पाटलांकडून निवडणूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ? नेमकं काय घडलं?
तो निष्ठांवत अन् कणखर, पित्याकडून मुलाचं कौतुक… गजानन किर्तीकर नेमकं काय म्हणाले? निवडणुकीनंतर इधर या उधर?