Sanjay Raut: हिंदू धर्मात फूट पाडून दंगली घडवण्याचा प्रयत्न; संजय राऊत यांचा मनसेवर आरोप
Sanjay Raut: कायद्याचं राज्य चालतं. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना आहेत. त्यानुसार काम होत असतं.
मुंबई: लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी मनसेवर (mns) गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्रात लाऊडस्पीकरचा मुद्दाच नाही. तणाव निर्माण करण्याचा दंगे घडवण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला. पण हा मुद्दा उठलाच नाही. प्रश्नच येत नाही. गृहमंत्र्यांनी सांगितलं ते बरोबर आहे. भोंग्यांबाबत राष्ट्रीय धोरण असावं. देशभरात ते लागू करावं. इथे जात आणि धर्माचा विषय येत नाही. मशिदीवरील (masjid) भोंग्याचा विषय ज्यांनी काढला. त्याचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्रात हिंदू मंदिरांना बसला. भजन, कीर्तन करणाऱ्या मंडळांना बसला. या भूमिकेवर सर्वात जास्त नाराज हिंदू समाज आहे. त्यांनी हिंदू समाजातच फूट पाडायचा प्रयत्न केला. त्यांना हिंदू धर्मात गट करून आपआपसात दंगली घडवायच्या आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला. तसेच, पण सुदैवाने महाराष्ट्रात असं काही होऊ शकलं नाही. या राज्यातील जनता सुजाण आहे, असंही राऊत यांनी सांगितलं.