भांडुपमधल्या घरातील एका खोलीत राऊतांचं मात्र लिखाण सुरु

| Updated on: Jul 31, 2022 | 3:56 PM

कागदपत्रांच्या छाननीनंतर ईडीकडून रिपोर्ट तयार करण्याचं काम सुरू आहे. गेल्या नऊ तासांपासून ईडीचे अधिकारी राऊतांच्या घरी आहेत.

कागदपत्रांच्या छाननीनंतर ईडीकडून रिपोर्ट तयार करण्याचं काम सुरू आहे. गेल्या नऊ तासांपासून ईडीचे अधिकारी राऊतांच्या घरी आहेत. मुंबईच्या गोरेगावमधील पत्राचाळ प्रकरणात ही चौकशी सुरु आहे. संजय राऊत यांच्या भांडुपममधल्या मैत्री निवासस्थानी ही चौकशी सध्या सुरू आहे. घरातील एका खोलीत राऊतांचं मात्र लिखाण काम सुरू आहे. ईडीचे काही अधिकारी आज सकाळीच राऊत यांच्या घरी पोहोचले. 10 ईडीचे अधिकारी राऊतांच्या मैत्री बंगल्यावर दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक आहे. या सुरक्षा रक्षकांनी राऊत यांच्या घराबाहेर पहारा सुरू ठेवला असून कुणालाही आत जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

“राज्यपालांचं वक्तव्य झाकण्यासाठी राऊतांवर कारवाई”, विद्या चव्हाण यांची टीका
भाजपकडून ईडीची भीती दाखवून विरोधकांचे खच्चीकरण – सुषमा अंधारे