‘राजीनामा नको, गृहमंत्र्यांना हकला; रात्री हुडी घालून फिरण्यापेक्षा…’, संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

| Updated on: Oct 13, 2024 | 11:42 AM

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी संजय राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यसरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. 'विरोधांबाबत काड्या करण्यापेक्षा, रात्री हुडी घालून फिरण्यापेक्षा...', बघा काय म्हणाले संजय राऊत?

‘काँग्रेसचे ते दीर्घकाळ नेते होते. त्यांची हत्या झाली. त्यांना सुरक्षा व्यवस्था होती. वाय दर्जा होती. त्यांच्या आजूबाजूला माणसं होती. एका कार्यक्रमातून बाहेर पडले होते. त्यांना मारेकऱ्यांनी गोळ्या घातल्या. मुंबईत ज्या पद्धतीने हत्यांचं सत्र सुरू आहे. त्या हत्या माजी मंत्र्यांपर्यंत पोहोचल्या. या राज्यात कोण सुरक्षित आहे. हे एकदा राज्याच्या अपयशी गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं पाहिजे’, असे म्हणत संजय राऊतांनी हल्लाबोल केलाय. सामान्य माणसं, महिला, व्यापारी सुरक्षित नाही, आता राजकीय कार्यकर्ते, आमदार, नेते सुरक्षित नाही. राज्यकर्ते काय करत आहेत. या राज्याचे गृहमंत्री हरियाणात निवडणुका जिंकल्या म्हणून पेढे वाटतात. पेढे खा तुम्ही, पण ती दहशत सुरू आहे, खंडणी सत्र सुरू आहे, अशावेळी गृहमंत्र्यांची काही जबाबदारी आहे की नाही? असा सवाल करत संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. पुढे राऊत असेही म्हणाले, राज्यातील इतिहासातील सर्वात अपयशी निष्क्रिय गृहमंत्री आहेत. आता गृहमंत्र्यांचा राजीनामा द्या मागत होतो. आता गृहमंत्र्यांना हकला. असं सांगण्याचीवेळ आली आहे. फडणवीस एकेकाळी काय होते आणि काय झाले. त्यांचं अधपतन झालं आहे. विरोधांबाबत काड्या करण्यापेक्षा, रात्री हुडी घालून फिरण्यापेक्षा गृहमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली त्या पदाला कर्तव्यभावनेने जागून काम करा, असे म्हणत राऊतांनी फडणवीसांवर खोचक टीका केली आहे.

Published on: Oct 13, 2024 11:42 AM