Sanjay Raut on Bhagat Singh Koshyari : राज्यपालांवर टीका करताना राऊतांची जीभही घसरली, राऊतांवर आशिष शेलारांची टीका

| Updated on: Apr 05, 2022 | 1:25 PM

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्यपालांवर हल्ला चढवला आहे. राज्यपालांवर टीका करताना राऊतांची जीभही घसरली. त्यावर आशिष शेलारांनी टीका केलीय. राऊतांना अशी भाषा शोभत नाही, असं शेलार म्हणालेत

नवी दिल्ली: विद्यापीठ कायद्यावरून पुन्हा एकदा संघर्ष निर्माण झाला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (bhagat singh koshyari) यांनी विद्यापाठात कुलगुरूंची नियुक्ती करण्यास सुरुवात केली आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी पुन्हा एकदा राज्यपालांवर हल्ला चढवला आहे. राज्यपालांवर टीका करताना राऊतांची जीभही घसरली. आम्ही संघर्ष करत नाही. त्यांना खाजवायची सवय पडलीय. त्यांची खाज कधी संपेल माहीत नाही. पण एवढीपण खाज बरी नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी राज्यपालांवर हल्ला चढवला आहे. नवी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी हा हल्ला चढवला. तसेच महामंडळाच्या नियुक्त्यांवरून महाविकास आघाडीतील (maha vikas aghadi) घटकपक्षांनाही टोले लगावले. महामंडळाच्या नियुक्त्या का रखडल्या? कुणामुळे रखडल्या? यासाठी स्वतंत्र चौकशी समिती नेमावी लागेल, असा टोला राऊत यांनी लगावला आहे. त्यावर आशिष शेलारांनी टीका केलीय. राऊतांना अशी भाषा शोभत नाही, असं शेलार म्हणालेत

 

 

Published on: Apr 05, 2022 01:04 PM
Sanjay Raut : मुख्यमंत्री भेटत नसल्याने खासदारांमध्ये नाराजी, मुख्यमंत्र्यांसोबत खासदारांनी बैठक होईल, शिवसेना नेते संजय राऊतांची माहिती
Samruddhi Mahamarga : समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा सुरू होणार, tv9मराठीला माहिती