“बाळासाहेबांचे आशीर्वाद तुम्हाला खरोखर लाभले असते तर तुम्ही..”, संजय राऊतांचा फडणवीसांना टोला
"बाळासाहेबांचे आशीर्वाद तुम्हाला खरोखर लाभले असते तर तुम्ही मुख्यमंत्री झाले असता. आज तुम्हाला उपमुख्यमंत्रीपदावर बसावं लागतंय. बाळासाहेब ठाकरे हे नाव आग आहे, त्या आगीशी खेळू नका", असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.
“असली शिवसैनिक कोण आणि नकली कोण याचं सर्टिफिकेट आम्हाला देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घ्यायची गरज नाही. असली शिवसेना ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आहे आणि ती तशीच राहील. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचं नाव वापरता. त्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतात. राजकीय स्वार्थासाठी तुम्ही अशा प्रकारची स्थिती निर्माण केली. बाळासाहेबांचे आशीर्वाद तुम्हाला खरोखर लाभले असते तर तुम्ही मुख्यमंत्री झाले असता. आज तुम्हाला उपमुख्यमंत्रीपदावर बसावं लागतंय. बाळासाहेब ठाकरे हे नाव आग आहे, त्या आगीशी खेळू नका”, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.
Published on: Jul 03, 2022 01:18 PM