तर मातोश्रीच्या आतल्या बातम्या बाहेर सांगेन; राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट

| Updated on: May 19, 2024 | 4:45 PM

उद्धव ठाकरेंच्या नावाला संजय राऊत यांचा मोठा विरोध होता. ज्याला कुठला अनुभव नाही ज्याला पक्ष चालवता येत नाही त्याला तुम्ही मुख्यमंत्री कसे करता हे तुम्ही शरद पवार यांना विचारले नव्हते का?, असा सवाल करत नितेश राणेंनी राऊतांवर निशाणा साधला.

तुम्ही मला मुख्यमंत्री बनवलं नाही तर मातोश्रीच्या आतल्या बातम्या बाहेर सांगेन, असं म्हणत संजय राऊत यांनी मातोश्रीत जाऊन उद्धव ठाकरे यांना ब्लॅकमेल करायला सुरुवात केली होती, असं गौप्यस्फोट नितेश राणे यांनी गेला. पुढे नितेश राणे असेही म्हणाले, तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांची प्रॉपर्टी कशी हडप केली? याची कागद पत्रे बाहेर देईन अशी धमकी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना दिली असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले. तर संजय राऊत यांनी शरद पवारांना देखील जाऊन सांगितले होते की, माझे नाव मुख्यमंत्री म्हणून चालवा असा आग्रह धरला असल्याचा म्हणत नितेश राणे यांनी दावा केला. सामना कार्यालातून किती आमदारांना फोन झाले होते की तुम्ही संजय राऊतचे नाव मुख्यमंत्री म्हणून सुचवा, कुठले ब्लॅकमेलिंग आणि धमक्यांचे धंदे सुरू केले होते, असा हल्लाबोलही नितेश राणे यांनी केला.

Published on: May 19, 2024 04:45 PM
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास… योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाचा हल्लाबोल
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ