Pune | आज पुण्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांचा विराट मेळावा, वडगाव शेरीत फ्लेक्सबाजी
कोथळा काढण्याच्या वादग्रस्त वक्तव्यावरून संजय राऊत यांना पुण्यात फिरू देणार नसल्याचा इशारा भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिला होता, त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत थेट जगदीश मुळीक यांच्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत आज पुण्यात जाणार आहेत. वडगाव शेरीत मेळावा घेत संजय राऊत उद्या भाजपला आव्हान देणार आहेत. कोथळा काढण्याच्या वादग्रस्त वक्तव्यावरून संजय राऊत यांना पुण्यात फिरू देणार नसल्याचा इशारा भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिला होता, त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत थेट जगदीश मुळीक यांच्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आहेत. संजय राऊतांच्या पुणे दौऱ्यावर भाजप काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे. संजय राऊतांनी कोथळा बाहेर काढण्याचं वक्तव्य केलं ते निषेधार्ह आहे, त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या विरोधात डेक्कन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करत अटक करण्याची मागणी जगदीश मुळीक यांनी केली होती. माजी आमदार जगदीश मुळीक यांचा वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ आहे.संजय राऊतांना पुण्यात फिरु न देण्याचं आव्हान मुळीक यांनी दिलं होतं. संजय राऊत आज वडगाव शेरीत सेना कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. भाजप आज नेमकं काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.