‘सामना’तून केलेल्या ‘त्या’ टीकेबाबत संजय राऊत यांचा यू-टर्न; म्हणाले, ‘मी फक्त…’
VIDEO | आमचा आत्मा जुन्या संसदेत अडकलाय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
नाशिक : दैनिक सामना या वृत्तपत्रातील रोखठोक या सदरातून संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह नव्या संसदभवनाच्या मुद्द्यावरून भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना स्टॅलिनशी करण्यात आली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या या टीकेबाबत संजय राऊत यांनी काहीसा यू-टर्न घेतल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, ‘मी मोदींची तुलना स्टॅलिनसोबत केलेली नाही तर मी फक्त इतिहास मांडला आहे.’ तर सध्या लोकांना बोलू दिलं जात नाही, लिहू दिलं जात नाही, लोकांवर दबाब आहे. कायद्याचा गैरवापर करून सरकार पाडलं जात आहे. किंवा सरकार स्थापन केले जात आहे. इतकेच नाही तर माणसं विकत घेतली जात आहे. ही हुकूमशाही किंवा राजेशाही असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी यावेळी केला. दरम्यान, यावेळी नव्या संसद भवनाबाबत संजय राऊतांना विचारणा केली असता ते म्हणाले, आमचा आत्मा जुन्या संसदेत अडकलाय, असे ते म्हणाले.