भाजपची ‘जान’ अदानींच्या पोपटात? धारावीचा लढ्यावरून सामनातून रोखठोक सवाल
मिंधे-फडणवीस सरकारने अदानींशी 'मुंबई'चाच सौदा केला आहे. असे भाष्य करत समानातून अदानींच्या मुद्द्यावरून मनसेच्या भूमिकेवरही सवाल केलाय. धारावीच्या शीर्षकाखाली सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. लाखोंचा मोर्चा धारावी-मुंबई वाचविण्यासाठी निघाला. यात भाजपच्या बेबीत विंचवाने डंख मारावा असे काय आहे?
मुंबई, १८ डिसेंबर २०२३ : अदानींविरुद्द लढाई आहे पण BJP घायाळ झाला आहे. मिंधे-फडणवीस सरकारने अदानींशी ‘मुंबई’चाच सौदा केला आहे. असे भाष्य करत समानातून अदानींच्या मुद्द्यावरून मनसेच्या भूमिकेवरही सवाल केलाय. धारावीच्या शीर्षकाखाली सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध करण्यात आला असून त्यात असे म्हटले की, ‘धारावीचा लढा हा मुंबई वाचविण्याचा लढा आहे. भांडवलदारांच्या छातीवर पाय ठेवून मुंबई महाराष्ट्रात सामील करून घेतली ती मुंबई पुन्हा भांडवलदारांची दासी कदापि होऊ देणार नाही. हा मराठी बाणा कायम आहे. ‘मुंबई’ दासी व्हावी म्हणून अदानी यांनी एकनाथ मिंधे, अजित पवार यांच्यासह पन्नासएक आमदार-खासदारांना आधी पायाचे दास किंवा पायपुसणे करून घेतले. पण तरीही लाखोंचा मोर्चा धारावी-मुंबई वाचविण्यासाठी निघाला. यात भाजपच्या बेबीत विंचवाने डंख मारावा असे काय आहे? लढाई अदानीविरुद्ध आहे, घायाळ भाजप झाला आहे. भाजपची जान अदानींच्या पोपटात आहे काय?’ असा सवाल करण्यात आलाय.