‘वांझ’ कारभार, पाळणा इकडे अन् दोरी हलवणारे दिल्लीत; ‘सामना’तून सरकारवर हल्लाबोल

| Updated on: Jun 07, 2023 | 8:18 AM

VIDEO | '...गतिमान सरकारचा वेग बैलगाडीपेक्षा कमी', सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा शिंदे-भाजप सरकारवर निशाणा

मुंबई : दैनिक सामना या वृत्तपत्रातील अग्रलेखातून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. सरकारचा कारभार घोषणांमध्ये गतिमान आणि प्रत्यक्ष कामात गतिमंद आहे. गतिमान सरकारचा वेग बैलगाडीपेक्षा कमी असल्याची टीकाही सामनातून करण्यात आली आहे. ‘मिंधे सरकारचा कारभार घोषणांमध्ये ‘गतिमान’ आणि प्रत्यक्ष कामात ‘गतिमंद’ असाच सुरू आहे. डबल इंजिनवाल्या सरकारची ही अधोगती आहे. सरकारची गती व मती हा अभ्यासाचा विषय आहे. या सरकारची अब्रू रोज चव्हाटयावर पडते आहे. तेव्हा कोणत्या गतीच्या गोष्टी करता? मुंबईसह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांचे कुलगुरू नेमायला एवढा उशीर केला. आता मुंबईसह महाराष्ट्रातील इतर महापालिकांना महापौर कधी मिळणार, या प्रश्नाचे उत्तर द्या!’, अशी विचारणा थेट सरकारला करण्यात आली आहे तर मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यावर पहिला विस्तार करायला 41 दिवस लागले व त्या विस्तारास नऊ महिने होऊन गेले तरी दुसऱ्या विस्ताराचा पाळणा हलायला तयार नाही. कारण सगळाच ‘वांझ’ कारभार सुरू आहे. पाळणा इकडे व दोरी हलवणारे दिल्लीत असे चित्र आहे. असे म्हणत हल्लाबोल केला आहे.

Published on: Jun 07, 2023 08:14 AM
राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला 7 वर्षानंतर जामीन मंजूर; काय आहे प्रकरण?
श्रीकांत शिंदे यांनी पुन्हा आदित्य ठाकरे यांना डिवचलं, म्हणाले, “ठाकरे नाईट लाईफ बाहेरुन शिकून आले असतील!”