संजय राऊतांनी किरीट सोमय्यांबाबत वापरला अपशब्द
किरीट सोमय्या यांनी अलिबागमध्ये उध्दव ठाकरे यांच्या 19 बंगल्याची मालमत्ता असल्याचे स्पष्ट केल्यापासून किरीट सोमय्यांना राज्यातील महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी फटकारले आहे.
किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना कोरोनाच्या काळात घोटाळा केला असल्याचे म्हणाले आहेत, त्यानंतर त्यानंतर सोमय्यांना पुण्यातील महापालिकेच्या दालनात धक्काबुक्की करण्यात आली. तेव्हापासून राजकारणाने एक वळण घेतल्याचं पाहायला मिळतय. कारण तेव्हा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील किरीट सोमय्या आणि भाजपवरती अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे हा आरोपांचा सिलसिला संपण्याचं नाव घेत नाही असं वाटतंय. त्यात आज संजय राऊत यांनी रागाच्या भरात किरीट सोमय्या यांना चुकीचा शब्द वापरल्याचं पाहायला मिळालं आहे. किरीट सोमय्या यांनी अलिबागमध्ये उध्दव ठाकरे यांच्या 19 बंगल्याची मालमत्ता असल्याचे स्पष्ट केल्यापासून किरीट सोमय्यांना राज्यातील महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी फटकारले आहे.ॉ